Jump to Navigation

जय जिजाऊ

 

 


 
 
 
 

जिजाऊ.कॉम हे एक, राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने प्रेरित, महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे.

 
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात विकासाचे स्वप्न उरीबाळगून झटत असणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या विचारांसाठी एक ग्लोबल व्यासपीठ बनणे, त्या विचारांनी इतरांना प्रेरणा देणे आणि अशा सर्व प्रेरित लोकांना संघटीत होऊन त्या विचारांचे प्रक्रियेत रुपांतर करण्यासाठी व्यासपीठ देणे हे जिजाऊ.कॉम चे एक उदिष्ट्य.
 
महाराष्ट्रातल्या प्रत्येक अविकसित घटकापर्यंत विकासाचे मार्ग नेण्यासाठी आणि जमेल त्या प्रकारे त्यांच्या सोबत विकास प्रक्रियेत राहण्यासाठी जिजाऊ.कॉम बांधील आहे. त्यासाठी "राष्ट्र निर्माण" या सदराखाली विविध शासकीय व अशासकीय विकासाच्या योजनांबद्दल एकेठिकाणी माहिती उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्यांनी अशा योजनांचा लाभ करून घेतलेला आहे त्यांच्याशी इच्छुकांना संवाद साधण्याची संधी दिली जाईल. तसेच इतिहासाचे ज्ञान नसले तर चालेल पण जान जरूर असावी, हे लक्षात ठेवून काही सदर आपल्याला महाराष्ट्राच्या उज्वल इतिहासाची विविध माध्यमातून सैर घडवतील.
महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगार विषयक प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि उद्योजकांना मार्गदर्शन करणे या साठीही जिजाऊ.कॉम प्रयत्नशील राहील.
 
फार काही नाही; पण हे सगळ करतांना एकच विचार जिजाऊ.कॉम ने केलाय -
 
"आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र हृदयात बाळगतो आणि त्यासाठी एकदातरी प्रयत्न करायचे आम्ही ठरवले आहे!"
 
आमच्यापैकीच एक व्हा आपला सहभाग नोंदवा. जिजाऊ.कॉम बद्दल अधिक माहिती साठी कृपया येथे वाचा.
 
 
 


Main menu 2

by Dr. Radut.