Jump to Navigation

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

p { margin-bottom: 0.08in; }

योजनेचे नाव :

 • पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती.

योजना /कार्यक्रमाचे स्वरूप / माहिती व व्याप्ती :

 • गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना अस्तित्वात आहे.

 • पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्त्या दिल्या जातात.

 • ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे चालू राहते.

 • शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक एससीएच-२००५/(१३९/०४)/केंपुयो, दिनांक १४ फेब्रुवारी २००७ अन्वये सन २००७-०८ या वर्षापासून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे (इयत्ता ८ वी ते १० वी) सुधरित दर रुपये १०० दरमहा करण्यात आले आहेत.

 • प्रत्येक टप्प्यात शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे.

 • ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात १० महिन्यांसाठी दिली जाते.

 • उपरोक्त शासन निर्णयान्वये संचात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

 • प्रत्येक जिल्ह्याचे ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी शिष्यवृत्तीचे ७९०८ संच मंजूर असून त्यापैकी शहरी भागासाठी ३११८ संच व ग्रामीण भागासाठी ४७९० संच तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीचे ७६२८ संच मंजूर असून त्यापैकी शहरी भागासाठी ३२०२ संच व ग्रामीण भागासाठी ४४२६ संच मंजूर आहेत.

विदर्भातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन :-

 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षेच्या आधारे पूर्व माध्यमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेमध्येच विदर्भातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर देण्यात येते.

 • सदर योजना फक्त नागपूर, अमरावती विभागासाठीच असून त्याचे एकूण पूर्व माध्यमिक स्तरावर ३६६ व माध्यमिक स्तरावर १९८ संच मंजूर आहेत.

 • सदर विद्यार्थ्यांना जुन्या दरानेच शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते.

योजनेचा उद्देश :

 • गुणवान विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

अंमलबजावणी यंत्रणा :-

 • शिक्षणाधिकारी (माध्यमिक) (प्राथमिक) जिल्हा परिषदेमार्फत राबविली जाते.Main menu 2

by Dr. Radut.