Jump to Navigation

स्पर्धा परीक्षा

p { margin-bottom: 0.08in; }a:link { } आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस इ. नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण नागरी सेवेत जावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था स्थापन केली असून त्यांच्या मार्फत नागरी सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील ओ पदवीधर तरुण-तरुणींना पूर्ण वेळ मोफत शिक्षण दिले जाते, या संस्थेईल प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. हि परीक्षा नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर आणि अभ्यासक्रमावर आधारित असते. या परीक्षेसाठी सामान्य अध्ययन (१५० गुण) व कोणताही वैकल्पिक विषय (३०० गुण) असे दोन पेपर असतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना संस्थेत प्रवेश दिला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन हि दिले जाते. मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे, परंतु जागा मर्यादित आहेत. वय मर्यादा २१ ते ३० (मागासवर्गासाठी वयाची अट शिथिल आहे ), विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. संस्थेतील प्रवेशासाठी  साधारणतः दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते , प्रवेश परीक्षेची फी सर्वसाधारण गटासाठी रु.२००/- तर मागासवर्गीयांसाठी रु. १००/- आहे. संस्थेच्या कार्यालयात फी भरून अर्ज मिळतो. या संदर्भात अधिक माहिती आपण या संकेतस्थळावर देखील बघू शकता http://www.siac.net.in/ किंवा इथे संपर्क करा राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (ए.आय.ए.सी.) हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर मुंबई - १ दूरध्वनी क्रमांक - २२०७०९४२/२२०६१०७१Main menu 2

by Dr. Radut.