Jump to Navigation

कृषी विभाग

 • कृषिविषयक घडामोडी आणि बाजार भाव माहिती : कापसाचे २०१० साठी चे भारतीय कापस निगम लिमिटेड (सी सी आय) चे भाव येथे बघता येतील. तसेच कापसाची जागतिक मागणी आणि पुरवठा याबद्दल हि माहिती मिळेल. (http://www.cotcorp.gov.in)

 • केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे व उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदान पुरवठा करण्यात येतो. सदर अनुदान ट्रॅक्‍टर, ट्रॅक्‍टरचलित अवजारे, बैलचलित अवजारे व स्वयंचलित अवजारे, महिला व शेतमजूर यांच्यासाठी लागणारी अवजारे, कृषिपंप, फलोत्पादन अवजारांसाठी वापरता येतो. ४० अश्‍वशक्तीपर्यंतच्या ट्रॅक्‍टरसाठी किमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ४५ हजार रुपयांचे अनुदान देय असते.

  या योजने अंतर्गत येणारी काही अवजारे आणि यंत्रे:

  पॉवर टिलर, ट्रँक्टर, मल्टी क्रॉप थ्रेशर, कल्टीव्हेटर इ.  या शिवाय अनेक यंत्रे या योजनेत समाविष्ट आहेत.केंद्र पुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या ह्या  योजनेच्या अधिक माहिती साठी कृषी अधिकारी,पंचायत समिती यांना भेटावे आणि सदर योजनेच अर्ज आर्थिक वर्षाच्या सुरवातीस त्याच्याकडे द्यावा लागतो.

 • शेतकरी मंडळ [सामुहिक प्रगतीचा मार्ग] :

  उद्देश:  शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे

  स्थापणेसाठी अट: कमीत कमी दहा शेतकरी सदस्य

  कार्य पद्धत्ती:

   १. बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करणे जसे त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादीविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवणे

  २. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे.

  ३. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे.

  ४. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे.

  ५. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे.

  ६. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे.

  ७. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे.

  ८. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जांचे नूतनीकरण इत्यादी विषयांवर प्रात्यक्षिक दाखविणे.

  ९. पर्यावरण संरक्षणावर जागृती अभियान चालविणे.

  १०. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.

  ११. भूजल परीक्षण, किचन गार्डन, झाडे लावणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, अन्न सुरक्षितता, सामुदायिक साक्षरता, बिगरशेतीवर आधारित स्वउद्योग यांवर कार्यशाळा आयोजित करणे. १२. महिला बचत गटांची स्थापना करणे व बॅंकेला जोडणे.

  शेतकरी मंडळ स्थापन करण्यासाठी  आपल्या भागातील कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा.

   

  बाजार माहिती केंद्र :

  स्पर्धेच्या जगात, शेतकऱ्याला बाजार भावांची अपडेटेड माहिती देणे आणि कृषी क्षेत्रात एक व्यावसायिक दृष्टीकोन आणण्यासाठी शिक्षित तरुण बाजार माहिती केंद्राची स्थापना करू शकतात.

  या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी मालाच्या वेगवेगळ्या बाजारातील भावांची माहिती देण्यात येईल आणि जास्तीत नफा कसा मिळवावा या बद्दल शेतकऱ्याला मार्गदर्शन केले जाईल. संबधित केंद्र या बाजार भावांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना कोणते पिक घ्यावे या बद्दल सुद्धा सूचना करू शकते. अशा प्रकारच्या केंद्रांचा उभारणी खर्च खूप कमी आहे आणि त्यासाठी शासनाकडून अनुदान हि मिळते. असे केंद्र चालवणे ही इंटरनेट आणि दूरसंचार तंत्र  यामुळे  खूप सोपे झाले आहे.

  अनुदान पूर्ण खर्चाच्या २५ %  किंवा जास्तीत जास्त रु. ५०००० इतके मिळू शकते.

  सदर योजनेची आधीक माहिती  तालुका कृषी अधिकारी  यांचेकडे मिळेल.

   आजचा कृषी बाजारभाव कृपया येथे क्लिक करा. ( सौजन्य: http://agmarknet.nic.in )

 Main menu 2

by Dr. Radut.