Jump to Navigation

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजना किमान कौशल्य असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कमीतकमी ७ वी पास असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षे इतके असावे. तो बेरोजगार असावा. नोकरीत असलेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो. लाभार्थी हा १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. या योजनेंतर्गत दवाखाना सुरू केल्यास दवाखाना महापालिका हद्दीत सुरू करता येणार नाही.

या योजनेंतर्गत प्रामुख्याने उद्योग, सेवा उद्योग, व्यापार, ट्रक, रिक्षा व ट्रॅव्हलिंग व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. त्यात प्रामुख्याने ७५ टक्के अनुदान शासनामार्फत दिले जाते. तसेच २५ टक्के रक्कम उद्योजकाने उभी करणे अपेक्षित आहे. प्रकल्पाची किंमत १ लाखाच्या आत असल्यास सर्वसाधारण उद्योजकास २५ टक्के, सर्वसाधारण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ४ हजार ८०० च्या आत असल्यास २० टक्के, मागासवर्गीय असल्यास २० टक्के, मागासवर्गीय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ४ हजार ८०० च्या आत असल्यास २२.५ टक्के, प्रकल्पाची किंमत १ लाखापेक्षा जास्त असल्यास फक्त १५ टक्के रक्कम उद्योजकास उभी करावी लागते. यात प्रकल्पाची जास्तीत जास्त किंमत १ लाख ५० हजार रूपयांपर्यंत असते. २० टक्के भांडवल मिळाल्यास ५ टक्के स्वत:ची गुंतवणूक करावी लागते. हे भांडवल कर्ज असून त्यावर १० टक्के सरळ व्याज आहे. वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी प्रकल्प मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत असून त्यासाठी केवळ ४ टक्के विक्रीकर आकारण्यात येतो.

योजनेच्या अधिक माहितीसाठी
आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय,
कोकण भवन, विस्तारित
तिसरा मजला,
सीबीडी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
दूरध्वनी २७५७१९४२ / २७५७१९४४

येथे संपर्क साधावा.Main menu 2

by Dr. Radut.