Jump to Navigation

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना

योजना उद्दिष्ट / वैशिष्टये :-

राज्यातील इयत्ता 1 ली पासुन उच्च शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना वेयक्तिक विमा योजना शासन निर्णय क्र. पीआरई 2001 /57783 /2891/ प्राशि - 1 दिनांक 20/8/2003 अन्वये सुरु करण्यात आलेला आहे. तसेच 1 वर्षा पर्यंत विमा कंपनीस विद्यार्थ्यांचा विमा संरक्षणाचा कालावधी नेमुन दिलेला असतो.हि योजना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा, तसेच खासगी संस्थांनी चालवलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये या मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

. क्र.
बाब
विद्यार्थ्यांना मिळणारी विम्याची रक्कम
1
अपघाती मृत्यु
रु. 30,000/-
2

 

कायमचे अपंगत्व (दोन अवयव / डोळे किंवा एक अवयव आणि एक डोळा निकामी )
रु. 50,000/-
3
अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी होणे
रु. 20,000/-
4
अपघातामुळे उद्भवलेला वैद्यकिय खर्च
कमाल रु. 2,000/- (किरकोळ उपचारासाठी)
कमाल रु. 10,000/- (शस्त्रक्रियेसाठी)
5
अपघातामुळे पुस्तके हरवल्यास
कमाल रु. 350/-
6
अपघातामुळे विद्यार्थी परिक्षेत बसु न शकल्यास परिक्षा शुल्काची प्रतीपुर्ती
कमाल रु. 650/-
7
अपघात सायकल चोरीस गेल्यास किंवा संपुर्ण नुकसान झाल्यास
कमाल रु. 1500/-
8
अपघातामुळे चष्मा हरविल्यास
कमाल रु. 750/-


या योजने संदर्भात अधिक माहिती संबंधित मुख्याध्यापक,  शाळा प्रशासन ,ग्राम पंचायत किंवा  गटशिक्षण अधिकारी , पंचायत समिती  यांच्याकडे मिळू शकते,

khup chan mahitiMain menu 2

by Dr. Radut.