Jump to Navigation

राष्ट्रमाता जिजाऊ शैक्षणिक योजना - २०१२ -१३

आग्रहाचे निमंत्रण ! तुम्हालाच, तुमच्याच कार्यक्रमासाठी !
जिजाऊ.कॉम प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी म्हणजे २०१२ -२०१३ मध्ये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. या साठीचा निधी तुम्ही आणि तुमच्या सारख्या समाजाबद्दल अत्यंत बांधिलकी असलेल्या लोकांनी जमा करून दिलेला आहे. तुमचे आभार मानावेत की नाही ? माहित नाही. तरी समाजाबद्दल तुमच्या असलेल्या बांधिलकीचा तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना खूप खूप फायदा होवो या सदिच्छ देवून आम्ही, जिजाऊ.कॉम, आपले खूप खूप आभारी आहोत. आपला सहभाग सदिच्छ आणि निधीच्या स्वरुपात आहेच, तरीही आपण स्वतः आपल्या आप्त स्वकीयांसहित या कार्यक्रमांना उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.
कार्यक्रम:
१. दिनांक १३/०७/२०१२
सकाळी १०:०० ते १२:००
श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालय, मानवत.
दुपारी २:०० ते ४:००
जिल्हा परिषद प्रशाला, पौळ डिग्रस, ता. सेलू
२. दिनांक १४/०७/२०१२
सकाळी १०:०० ते १२:००
जिल्हा परिषद प्रशाला, नांदगाव, जि. परभणीMain menu 2

by Dr. Radut.