Jump to Navigation

RAJANCHE ABHIYANTIPAN

रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असेम्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाचरायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोगकैदी ठेवण्यापुरता होई. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरेविजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरीमहाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्लाअहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याचीबातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी यागडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच.पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तोउंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आलेलाइंग्रज वकील टॉमस निकल्स रायगड दर्शनानेइतका प्रभावित झाला अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्यास हा गड थोड्या सैन्यासह सुद्धा संपूर्णजगविरूध्द लढू शकेल
अशी नोंद केली
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.
१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टरMain menu 2

by Dr. Radut.