Jump to Navigation

गणेश चतुर्थी

भारतात हिंदू संकृतीत अनेक देवी देवतांचे स्थान आहे . जगामध्ये भारत हा असा देश आहे ज्यामध्ये अधिक देवांचे अस्तित्व मानल्या जाते व देव पूजन सण उत्सव पूजापाठ केली जाते त्यापैकी अनेक देवांपैकी गणपती हा यांचा देव विघ्नहर्ता म्हनुण्याची पूजा केली जाते भारतात याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो भारतीय ब्राह्मणी संस्कृतीत हिंदू धर्मात शुभकार्याच्या अगोदर गणेश पूजन केले जाते आता शुभ कार्य म्हटले कि गणेशाची सर्वाना आठवण येते मग अगदी घरावर किंवा वाहनावर पुस्तकावर अश्या विविध ठिकाणी या विघ्नहर्त्याचे पोस्टर लावलेले असते आता तर लोकांनी हद्दच पार केली आहे आज काळ जो तो ओरडूनच सांगत असतो कुणाला गणपती झाडत दिसतो तर कुणाला फळात दिसतो आज काळ आपले काम चांगले व्हावे म्हणून देवाला खुश करायची रीत हिंदू धर्मात सुरु झाली आहे जो तो या न त्या परीने देवाला खुश करीत असतो कोणी गणपतीला मोदकाचा प्रसाद तर कोणी अन्य काही असे या गणपतीचे पूजन या धर्मात महान असे आहे
गणपती :- भारतात सिंधू संस्कृतीला मनाचे स्थान आहे . मोहेजदडो आणि हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या माहितीतून सिंधू संस्कृतीचे खरे दर्शन
पाहायला मिळते लोकशाहीचा मूलाधार असलेली शासन प्रणाली आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडते गणपती हे हन्संस्थेच्या नायकाचे पद होते गण + पती या दोन शब्दांनी गणपती हा शब्द तयार झाला गण म्हणजे लोक समूह त्याचे काम लोकांचे रक्षण करणे पालन करणे असे असून तो नायक म्हणजे गणपती असे प्राचीन काळी भारतीय समाज हा लहान लहान लोकवस्तीतून बनलेला होते पाच दहा झोपाद्याच्या समूहाने प्राचीन भारतात लोक राहत असत त्याला पाडा म्हणत असे दहा बारा पाडे मिळून गाव तयार होत असे आणि अनेक गावांचा मिळून बनलेल्या समूहाला गण असे म्हणत या गणांचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालत असे गावात सोय सुविधा ठेवणे शांतता राखणे तंटे सोडविणे असि कामे गणपती आपल्या गण परिषद यांच्या मार्फत सोडवत असे गणपती हा सर्व शक्ती संपन्न माणसाला बनवला जात असे बाह्य आक्रमणापासून गणांचे रक्षण करणे त्यांची सर्व संकटापासून सोडवणूक करणे हि कामे गणपती करत असे त्यामुळे गणातील लोक हि त्याला पाला विघ्नहर्ता समजायचे गणपती आपले कार्य रीतसर व्हावे म्हणून अष्टप्रधान मंडळ निर्मित असे त्यांना सल्ला व मार्गदर्शन करत असे तसेच त्यांचे विचार जाणून घेत असे मगच तो आपले कार्य पूर्ण करीत असे आपल एकहाती निर्णय गापती कधी करीत नसे त्यामुळे लोक सुद्धा अस्य गणपतीला आदराचे स्थान देत असे मग गणामध्ये या लोकवस्तीमध्ये कोणते शुभ कार्य असेल तर अश्या ठिकाणी गणपतीला आमंत्रण दिले जायचे व त्याला लोक आदराने पूजन करायचे
गणपती म्हणजे गन्प्रमुख आता हा गानाप्रमुख पाड्यातून गावागावातून लोकांच्या संगनमताने निवडून द्यायचे ते गावातील एखाद्या धाडशी साहसी पराक्रमी व तो युद्धकलेत पारंगत बुद्धिमान व्यक्तिमत्वाच्या जोरावर तो गण नायकाची भूमिका राबवीत असे स्व:तासह तो आपल्या गणांची देखील देखभाल करीत असे अश्या या गणपतीचे स्थान प्राचीन काळापासून तयार झाले आहे
गणपती संबंधी दंतकथा : गणपतीचा जन्म भाद्रपद चतुर्थीला झाला असे पौराणिक कथेतून मानले जाते ह्या दिवशी हिंदुत्ववादी लोक गणेशाची मूर्ती विकत घेवून तची आप आपल्या घरी स्थापन करतात त्याला मोदकाचे नैवेद्य दाखवतात गणपतींच्या जन्माच्या अनेक काठ आपल्याला पौराणिक कथेत मिळतात तशीच सर्वात प्रचलित कथा अशी आहे
गणपती हा मुल पार्वतीचा पुत्र मनाला जातो पार्वतीचे पती शंकर भगवान शिकारीला रानात गेला होता पार्वती महालात एकटीच होती तिला घरी एकांतात अंघोळी करण्याची इच्छा झाली आणि तिला अंघोळी निर्वस्त्र करायची होती तिला अंघोळी मध्ये व्यत्यय येवू नये म्हणून तिला पाह्रेकारीची आवश्यकता होती व तिने त्यासाठी एक युक्ती केली स्वताच्या शरीराचा माल काढून त्याला आकार दिला तो आकार एका बालका वाणी झाला तिने त्यावर आपल्या दैवी कलेचा वापर करून अमृत शिंपून सजीव केले एक जिवंत बालक जन्माला आले तिने ते बालक आपला पुत्र मानले पार्वतीने त्याला प्रवेश द्वारापाशी उभे केले व आदेश दिला कि कोणालाही आत येवू द्यायचे नाही जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठणकावून सांगायचे माझी मत आत स्नान करीत आहे व तिची अंघोळी होईपर्यंत कोणीही आत जावू नका म्हणून माझी अंघोळी होईपर्यंत कोणालाही आत सोडू नको असे सांगून पार्वती अंघोळीला महालात गेली . काही वेळानी शंकर भगवान शिकारीवरून परत आले स्व:तला महालात प्रवेश करतेसमयी प्रवेश द्वारापाशी उभ्या असलेल्या बालकाने त्याला अडवले व आत जाण्यास मज्जाव करणारा बालक पाहून शंकराला नवल वाटले आपल्याच घरी आपल्याला जाण्यास मज्जाव केला जातो शंकराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो बालक हट्टास पेटला होता त्यामुळे शंकराला त्याचा खूप राग आला त्यांनी आपल्याकडील हत्याराने त्या बालकाच्या मानेवर आघात केला व शीर धडापासून वेगळे केले आणि महालात प्रवेश केला कोणी तरी आल्याची चाहूल लागताच पार्वतीने लगबगीने अंघोळ करून महालात आली पाहते तर शंकर तिला दिसले तिने शंकराला आत येण्याबाबत व बालका संबंधी माहिती विचारली असता शंकराच्या हातून बालक मारले गेल्याचे समजते स्वताचा मुलगा मेल्याचे पाहून तिला दु;ख झाले ती हट्टास पेटून उटली कि मुलाला जिवंत करा म्हणून तिने आपले आक्रोश करण्यास शुरुवात केली तचे ते भयानक रूप पाहून शंकराला तिची दया आली त्यांनी छाटलेल्या मुंडक्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडेना नंतर त्यांनी सैनिकांना आदेश दिला कि सर्वप्रथम जो प्राणी भेटेल त्याचे मुंडके घेवून या त्यपेअमने सैनिक गेले असता त्यांना हत्तीचे दर्शन प्रथम झाले त्यांनी हत्तीचे शीर शंकरापुढे ठेवले शंकराने ते मुंडके बालकाच्या धडाला जोडून त्याला जीवदान दिले अश्या प्रकारे गजाननाची निर्मिती झाली
गणपती जन्म कथेविषयी परीक्षण : पार्वती हि शंकराची पत्नी आणि ती दैवी रूप होती आणि तिच्या महालात दास दासी तर असणार मग तिला पहारेकरी म्हणून का गरज भासली असावी आणि तेही स्वताच्या मुलाची नेमणूक करण्याची काय आवश्यकता होती असा प्रश्न निर्माण होतो शिवाय स्वताच्या मळा पासून बालक तयार करण्याइतपत मळ अंगावर असणे हि एक हास्यास्पद गोष्ट आहे या प्रकारात इतका मळ अंगातून जाने हि पार्वतीला शोबणारी गोष्ट नव्हे आणि मळा पासून बालक बनणे अशक्यप्राय आहे आणि मालापासून गणेशाची निर्मिती आकारानुसार योग्य वाटत नाही बालकाची उंची मळ याचा आकार हि बाब पटण्यासारखी नाही शिवाय पार्वतीला निर्वस्त्र अंघोळीचा प्रकार सांगून पर्वतीसारख्या स्त्री जातीची अवहेलना करीत असल्याचा प्रकार वाटतो या कथेतून स्त्री जातीविषयी आखलेला वाईट विचार आपल्याला पाहायला मिळतो स्त्री विभात्सपणासारखा हा प्रकार दिसून येतो
शंकराने बलाकचे मुंडके छाटले परंतु ते भगवान शंकराला सापडू शकले नाही हे देवरूपी शंकराला शोभण्यासारखे नाही शिवाय शंकर बालकाचे मुंडके जोडून बालकाला जिवंत करू शकले असते परंतु त्यासाठी त्यांनी जनावराच्या मुंडक्याचा वापर करावा हे हि पटण्याजोगे नाही आणि बालकाच्या धडाला जनावराचे शीर लावणे हे हि बुद्धीला पटण्याजोगे नाही आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत अनेक शोध लागलेले आपण पाहतो जर मानवी शरीरावर जनावराचे मुंडके प्रत्यारोपण केले तर ती काळाची गरज आहे कारण आज काळ कोणाचे डोळे खराब होतात तर कोणाच्या मेंदूत बिघाड होतो अश्या लोकांना जनावराचे अवयव लावता येतील आणि हि संकल्पना प्राचीन काळी झाली ती अगदी कपोल कल्पित वाटते आज वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असली तरी आजही मोठ मोठे डॉक्टर हे गणपतीचे भक्त आहेत आपण विचार केला तर हत्तीच्या मेंदूचे काम जर मानवाच्या मेंदुसारखे होत असते तर आज हत्ती नक्कीच मानवापुढे असते किती हास्यास्पद गोष्ट आहे तसे पहिले तर मानवाचे आणि जनावराच्या मेंदूचे कार्य समान असू शकणार नाही त्याची वागणूक जनावरासाठी असेल मानवासारखी नसेल शिवाय त्याची बुद्धी विकसित नाही होणार तरी भारतीय हिंदू संस्कृतीत गणपतीला बुद्धिमान तसेच विद्येचा देवता मानल्या जातो यासारखे आणि दुसरे कोणते अज्ञान पण राहू शकेल हि संस्कृतीची दयनीय अवस्था असल्यासारखे वाटते
ब्राह्मणांचे षड्यंत्र : भारताची मुळ संस्कृती {सिंधू गोंड द्रविड } विदेशातून आलेल्या लोकांनी भारतीय संस्कृतीचा विनाश करण्याचा सपाटा लावला त्यांनी बहुजनांना कपटाने गुलाम बनवले तसेच तसेच त्यांना हीन दर्जा दिला त्यांना संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नसल्याचा सांगितले त्यांची सर्वांगीण अधोगती होईल यावर सर्वतोपरी
उपाय योजले त्यांनी आपला व्यवसाय चालवण्यासाठी बहुजानावर आपले कापोकाल्पित देव लादले परंतु सुरुवातीच्या काळी गणपती म्हणजे गणांचा नायक याला लोकांनी पूजनीय स्थान दिले होते ब्राह्मणांनी अनेक पुरण लिहून कापोकाल्पित कथा लिहून भोळ्या भाबड्या लोकांना मूर्ख बनवत गेले व गणपतींची काल्पनिक कथा मांडून गणांच्या नायकाच्या गणपतीला यांनी असे देवपण दिले आणि विविध पुराने लिहून त्यांनी तेहतीस कोटी देवांची निर्मिती केली
ब्राह्मणांनी बहुजनांना त्याच त्या कथा शेकडो वेळा सांगून सत्यापासून वंचित ठेवून वास्तववादी दैववादी ईश्वरवादी व ग्रंथाप्रमाण्यावादी बनवले इंग्रज राजवटीत म. फुलेंनी शिव महोस्तव सुरु केला त्याचा मुख्य उद्देश लोकांनी संघटीत यावे म्हणून आणि त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून पण त्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून टिळकांनी गणेश उत्सव सुरु केला हा त्यांचा भात मान्य कावा होता पूजा अर्चा करून ब्राह्मणांची पोटे भरावी म्हणून तसे केले आज बहुजनांवर अनेक सन उत्सव लादले गेले आजही गणपती ब्राह्मण लोक अर्ध्या दिवसाचा आणतात आणि मात्र बाकीच्या लोकांना ते अकरा दिवसांचा असावा असे सांगतात बहुजन आजही मातीची गणपती आणतात आणि त्याची स्तपणा ब्राह्मण लोकाकडून करून घेतात दक्षिनाच्या रूपाने अनेक संपत्ती ब्राह्मणांनी जमा केली ज्या गणपतीची दहा दिवस मोठ्या उत्साहाने गोड कौतुक करतात आणि अकराव्या दिवशी निर्दयतेने पाण्यात्ब बुडवले जाते अश्या या गणपतीच्या भक्तांवर अनेक साधू संतानी ताशेरे ओढून जनजागृती केली पण ब्राह्मण वाद्यांनी त्यांच्या विचारांना तडा दिल्या लोकांच्या मनात आज गणपती हा एक महान देव असल्याची कल्पना रुजू केली आहे शंभर वर्षे जे डोक्यात भरवले जाते ते सहजसहज मिटू शकणार नाही त्यासाठी काही कालावधी लागतो लोकांची मने बदलायला आणि आज न उद्या या भारत देशाचे स्वरूप काही वेगळे असेल

जय भीमराय
जय शिवरायMain menu 2

by Dr. Radut.